¡Sorpréndeme!

Lokmat News | तपारीया कुटुंबाने खरेदी केला मुंबईतील सगळ्यात महागडा फ्लॅट | Lokmat Marathi News

2021-09-13 0 Dailymotion

नेपिअन सी रोडवरच्या द रेसिडेंस टॉवरमध्ये २८ व्या ते ३१ व्या मजल्यावरचे ४ फ्लॅट रुनवाल ग्रुपच्या तपारिया कुटुंबानं विकत घेतले आहेत.मुंबईतल्या लक्झरी टॉवरमधले हे फ्लॅट १.२ लाख रुपये प्रती स्क्वेअर फुटाला विकले गेले आहेत. या प्रत्येक फ्लॅटचा एरिया ४,५०० स्क्वेअर फूट एवढा आहे.तपारिया कुटुंबाची लिगल फर्म वाडिया गांधींनी बुधवारी एक पब्लिक नोटीस काढून रुनवाल ग्रुपकडून ही खरेदी झाल्याची माहिती दिली. तपारिया कुटुंबानं फ्लॅट खरेदीसोबतच २८ कार पार्किंगही विकत घेतलं आहे. ६ वर्षांपूर्वी ह्या फ्लॅट्स ची किंमत याहून जास्त होती.तरीही गेल्या तीन वर्षं विकले गेलेले हे सगळ्यात महाग फ्लॅट्स आहेत. दोन वर्षांपूर्वी तपारिया कुटुंबानं ६० कोटी रुपयांना ११ हजार स्क्वेअर फूटाचा डुप्लेक्स फ्लॅट विकत घेतला होता.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews